Android app on Google Play

 

अध्याय ३२

 

श्रीगणेशायनमः ॥ वैष्ण्वीमायाजगन्मोहिनी ॥ चराचरविश्वाचीजननी ॥ तुळजादेवीसुखदायिनी ॥ नरायणीतुजनमो ॥१॥

श्रोतोऐकासावचित्त ॥ महाविष्णुसुरगणाप्रत ॥ म्हणेमजाआहेविदित ॥ दैत्याचेंचेष्टितसर्वही ॥२॥

तुम्हांदेवाचेंराज्यवैभव ॥ दैत्यानैधनादिहरिलेंसर्व ॥ तुमच्याअधिकारावरीदानव ॥ स्थपैलेसर्वधारासुरें ॥३॥

हापूर्वींचसर्ववृत्तांत ॥ नारदानेंमजकेलाविदित ॥ याविषयींउपायनिश्चित ॥ योजूनठेवलाआहेम्यां ॥४॥

तुम्हीसुरगणसमस्त ॥ होऊनियांनिर्भयचित्त ॥ गमनक्रावेंस्वस्थळाप्रत ॥ कार्यसंपादीनमीतुमचें ॥५॥

शिघ्रकाळेंकरोनीनिश्चित ॥ त्यादैत्यांचाकरीनघात ॥ स्कंदम्हणेहरीचेंवचनामृत ॥ ऐकोनसुरगणसुखावले ॥६॥

नमस्कारकरुनीश्रीहरिसी ॥ होऊनियांस्वस्थमानसीं ॥ देवगेलेस्वस्थानासी ॥ रुद्रप्रमुखसर्वही ॥७॥

स्वस्थानासीसर्वदेव ॥ गेल्यानंतरवासुदेव ॥ कमलनयनतोमाधव ॥ दैत्यवधासीचिंतितसे ॥८॥

कोणतेउपायेंदैत्यनाश ॥ होततेंजाणोनीसवेंश ॥ सत्यसंकल्पहृषीकेश ॥ गरुडारुढहोयतात्काळ ॥९॥

आलायमुनापर्वताप्रत ॥ जेथेंधारासुरराज्यकरित ॥ दानवज्याचेआज्ञांकित ॥ मंत्रदाताशुक्रज्यासी ॥१०॥

विष्णुभक्तिपरायण ॥ दक्षयायजुकबलीसमान ॥ राज्यलक्ष्मीनेंविराजमान ॥ महाबलपराक्रमी ॥११॥

धारासुररभ्यसभास्थित ॥ दैत्यसभासदपरिवारित ॥ तेथेंनारदमुनीत्वरित ॥ सभेमाजींपातला ॥१२॥

नारदासीअवलोकुनी ॥ धारासुरउठोनीतेचक्षणीं ॥ समोरजाउनीलालागलाचरणीं ॥ उत्तमाअसनींबैसविलें ॥१३॥

सद्भावेंनारदासीपुजोनी ॥ क्षेमकुशलविश्वारोनी ॥ संनिधबैसोनिविनवनी ॥ करितांझालीदैत्यनाथ ॥१४॥

म्हणेमीआजझालोंधन्य ॥ मजसमकोणीनसेअन्य ॥ तुमच्यापदरजस्पशेंमान्य ॥ पवित्रझालोंनारदा ॥१५॥

पूर्वजन्मीचेंसुकृत ॥ सफळझालेंआजबहुत ॥ तूंविष्णुभक्तपवित्रदांत ॥ तुझेंदर्शनजझालें ॥१६॥

तुझेंदर्शनतेंविष्णुदर्शन ॥ मजलागेंझालेंपूर्ण ॥ आज्ञाकरावीमजलागुन ॥ सेवासांगावीमजलागीं ॥१७॥

स्कंदम्हणेदैत्यराजवचन ॥ नारदेंसर्वहीऐकुन ॥ विस्मितहोऊनीबोलेवचन ॥ सर्वसभेच्यासमक्ष ॥१८॥

म्हणेतुत्रिभुवनींधन्य ॥ तुजसमकोनीनसेअन्य ॥ तुजभीतसेदेवसैन्य ॥ इंद्राद्रिकसर्वही ॥१९॥

त्यापराक्रमेंकरुन ॥ स्वाधीनकेळेंत्रिभुवन ॥ पूर्वीपितातुझाबलिमहान ॥ त्रिलोकशासनकरितहोता ॥२०॥

तोतपरीपरमविष्णुभक्त ॥ तैसाचतुंहीअससीनिश्चित ॥ तुझ्यापित्यासीपाळस्थित ॥ केलेंमहाविष्णुनें ॥२१॥

तूंहीपरमनिर्वाणसिद्धि ॥ विष्णुप्रसादेपावसीनिरवधि ॥ सुरगणांनीजाऊनीक्षीराब्धी ॥ तीरींप्रार्थिलामहाविष्णु ॥२२॥

तोतुजवधावयाचक्रपाणी ॥ आजचयेउनीसमरंगणीं ॥ तुजमारीलस्वचक्रेंकरुनी ॥ तुजकळावावयामीआलों ॥२३॥

तृंस्थीरहोऊनीत्यासी ॥ सहयुद्धकरीवेगेंसी ॥ अथवायेईलतुझ्यामनासी ॥ तैसेंकरीदैत्यनाथा ॥२४॥

देवाचाकरावयाकार्यार्थ ॥ आलाअसेवैकुंठनाथ ॥ तुजमहाकळावागुह्यार्थ ॥\ म्हणोनिसांगावयाआलों ॥२५॥

स्कंदम्हणेनारदवचन ॥ एकोनसंतोषलाबलीनंदन ॥ नारदासीप्रतिवचन ॥ धारासुरदेतसे ॥२६॥

म्हणेतरीबहुउत्तमझालें ॥ विष्णुनेंस्वह्स्त्रेमजमारिलें ॥ तरीमीधन्यमजवेगळे ॥ सभाग्यत्रिलोकीनाहींकोणी ॥२७॥

जन्मोजन्मीचेंसुकॄत ॥ त्याचेंफळामजहोईलप्राप्त ॥ जरीमीपाहीनवैकुंठनाथ ॥ श्रीहरिस्वनेत्रोंनारदा ॥२८॥

त्याचेदर्शनाचालाभाअधिक ॥ त्यापुढेंतुच्छहेंविषयसुख ॥ त्र्यैलोक्यविजयराज्यदेख ॥ अधिकनवाटेमजकांहीं ॥२९॥

माझ्यापित्यनेंत्र्यैलोक्यअर्पण ॥ महाविष्णुसीकेलेंजाण ॥ तैसेंमीहीसर्वअर्पण ॥ करीनश्रद्धेनेंनारदा ॥३०॥

स्कंदम्हणेदैत्यवाणी ॥ नारदमुनीनेंऐकोनी ॥ धान्यम्हणोनीतेचक्षणीं ॥ त्यासीपुसोनीगेलास्वर्गासी ॥३१॥

देवऋषीजाताचनिघोन ॥ तात्काळभगवानकमलक्षण ॥ नगराच्यासमीपयेऊन ॥ शंखपांचजन्यफुकिला ॥३२॥

ज्यांशंखासीनिरंतरहातीं ॥ धरुनीवागवीकमलापती ॥ त्यांशंखाचीनादोन्नति ॥ ब्रह्मांडांतनसमाये ॥३३॥

त्याशंखाचानाद उत्तम ॥ ऐकोनियांदैत्योत्तम ॥ जाऊनीपाहेतपुरुषोत्तम ॥ गरुडारुढप्रत्यक्षेदखिला ॥३४॥

शंखचक्रगदाशार्ग ॥ अलंकृतचतुर्भुजपीतवसन ॥ कौस्तुभवनमालविराजमान ॥ सर्वालंकारशोभती ॥३५॥

महाविष्णुसीपाहुनी ॥ दानवश्रेष्ठहर्षलामनीं ॥ चतुरंगसेनासज्यकरोनी ॥ युद्धासीसंनिधपातला ॥३६॥

तामसभावधरोनीअंगीं ॥ य्द्धसीआलारणरंगीं ॥ दैत्याधिपासीपाहुनवेगीं ॥ श्रीहरीनेंतेवेळी ॥३७॥

स्वमायेनेकरुनीमोहित ॥ म्हणेजेदैत्यभावेअतिगर्वित ॥ त्यासीकरोनीनिश्चित ॥ भाषणकेलेंतेऐका ॥३८॥

श्रीहरीम्हणेदैत्यासी ॥ त्वांजिकिलंइंद्रादिदेवासी ॥ त्यांचेऐश्वर्ययेभोगिसी ॥ दानवसमुदायसमवेत ॥३९॥

आतांतुजनिश्चयेंमारिन ॥ देवपाहतीलतुझेंमरण ॥ त्यांचेराज्यत्यासी देईन ॥ हविर्भागघेतीलपूर्ववत ॥४०॥

यास्तवत्वांजोवेंरसातळीं ॥ जाऊनीराहेपित्याजवळी ॥ नऐकसीतरीयेवेळीं ॥ व्यर्थप्राणासीमुकसील ॥४१॥

ऐकोनीविष्णुचेवचनासी ॥ असुरसवेचीबोलेत्यासी ॥ हेपुरुषोत्तमतुजसी ॥ भिवोनीनजायपाताळा ॥४२॥

माझापराक्रमपाहेयेथ ॥ मजसीयुद्धकरीतुं निश्चितं ॥ निष्कपटत्वांझुंजवेंत्वरित ॥ मजसीसहदेवनाथ ॥४३॥

मजलागींनाजिंकितां ॥ कोठेंजाशिलसांगाअतां ॥ कोठेंराहसीलवैकुंठनाथा ॥\ बोलतत्त्वतांवेळीं ॥४४॥

स्कंदम्हणेदैत्यवचन ॥ ऐकोनियांनारायण ॥ अतितिक्ष्णदहाबाण ॥ सोडोनीदैत्यासीविंधित ॥४५॥

बाणविद्धझालाअसुर ॥ नादकरोनीभयंकर ॥ गरुडमस्तकींगदाप्रहार ॥ करिताझालावेगेंसी ॥४६॥

गदाआदळलीशिरावर ॥ महाप्रतापीविनताकुमर ॥ तुंडप्रहारनखाग्रप्रहार ॥ बहुइतकेलेदैत्यासी ॥४७॥

गरुडाअणिधारासुर ॥ यादोंघांचेयुद्धथोर ॥ सर्वलोकभयंकरहोतेझालेसमयीं ॥४८॥

पक्षीआणिदानवेश्वर ॥ एकमेकांसीकरितीप्रहार ॥ दोघेबलपराक्रमेंथोर ॥ कंपितरितीभुमीसी ॥४९॥

दोघेहीरक्तलिप्तशरीर ॥ धांवतीएकमेकावर ॥ गरुडपक्षवाततरुवर ॥ उन्मळूनीपडतीभूमीवरी ॥५०॥

पर्वतशिखरेंढासळती ॥ शुष्कपणेंजैसीगळती ॥ देवदानवगंधर्वपाहती ॥ विद्याधरमाहोरग ॥५१॥

त्यादोघांचेंयुद्धपाहुनी ॥ सर्वहीविस्मयकरितीमनीं ॥ ऐसेंयुद्धकरितारणीं ॥ बहुतकाळलोटला ॥५२॥

तेव्हाजवंतोदैत्यनाथ ॥ गरुडासीधरावयाधांवत ॥ तवगरुडानेंचंचुपटांत ॥ बळकटधरिलेंदैत्यासी ॥५३॥

गरगराफिरवोनी शतवार ॥ भूमीवरीआपटिलाअसुर ॥ मूर्छापांवोनीधरणीवर ॥ विकळहोऊनीपडिलासे ॥५४॥

जैसापक्षीअकस्मात ॥ पक्कफळमुखीधरीत ॥ तेंगळोनीभुमीवरीपडत ॥ छिन्नभिन्नहोयफळजैंसे ॥५५॥

तैसेंझालेंधारासुरासी ॥ बहुतपावलाव्यथेसी ॥ मुखांतुनीवमनरक्तासी ॥ वारंवारकरीतसे ॥५६॥

मूर्छासावरोनीदैत्यनाथ ॥ विष्णुकडेआलधांवत ॥ तवविष्णुनेंगदाप्रहारत्वरित ॥ मस्तकीकेदैत्याच्या ॥५७॥

तेणेंतोझालामुर्छित ॥ मूर्छाजावोनीसावधहोत ॥ त्रिशुलघेऊनहातांत ॥ कोपेंमारीतविष्णुसी ॥५८॥

भगवानतेव्हाखंगघेऊनी ॥ शुलासीशतखंडकरोनी ॥ टाकिलेंतेअसुरेंपाहुनी ॥ गदाघेऊनीधांवला ॥५९॥

तेव्हांश्रीहरीनेंत्वरित ॥ तीक्ष्णबाणमारिलाहृदयात ॥ दैत्यपुन्हांझालामूर्च्छित ॥ पुन्हांसावधझालातो ॥६०॥

शक्तिघेऊनीयांकरीं ॥ मारिलेंहरीच्याहृदयवारी ॥ परिकिंचितचळलानाहींहरी ॥ पुष्पप्रहारेंगजैसा ॥६१॥

दैत्याचापराक्रमापाहुनी ॥ विस्मयहरीसीहोऊनी ॥ स्वमायेनेंमोहितकरुनी ॥ बोलतांझालादैत्यासी ॥६२॥

कायबोलिलाभगवान ॥ उत्तराध्यायींत्याचेंव्याख्यान ॥ म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ श्रोतियांसीआदरें ॥६३॥

इतिश्रीस्कंदपुराणे सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे ॥ धारासुरयुद्धवर्णनंनामद्वात्रिशोध्यायः ॥३२॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥