Get it on Google Play
Download on the App Store

सैतानाशी करार 2

ती व्यक्ती अंतर्धान पावली. माधव पुन्हा काही मंत्र पुटपुटू लागला. तेलचूल त्याने जोराने पेटविली. हिरव्या-निळया ज्वाळा सो सो करीत होत्या. त्या कोपर्‍यातील कुत्र्याकडे पाहा. हळुहळू त्याच्यातून एक मनुष्य बाहेर पडत आहे. ते पाहा मोठे डोके, ते पाहा हात, ती छाती, ते पाय. तो पाहा लांब अंगरखा व डोक्याला रुबाबदार फेटा. ती पाहा हातात भली भक्कम काठी, ते पाहा पायात जोडे. कशी भव्य आहे आकृती! ती आकृती माधवासमोर उभी राहिली.

‘कोण तू?’’ माधवाने प्रश्न केला.

‘‘तुला ज्याची जरूर आहे तोच मी.’

‘माझ्या सर्व इच्छा पुरवशील? मला पाहिजे ते देशील?’

‘हो. तुला जे पाहिजे ते देईन. एवढेच नव्हे, तर जगातील सारी सुखे तुला चाखवीन. केवळ मनुष्ययोनीचीच नव्हे, तर भूतयोनीतील, पिशाच्च लोकातीलही सुखे तुला दाखवीन. तुला सर्वत्र हिंडवीन, फिरवीन. जीवनातील मौज दाखवीन’

‘परंतु हयाबदल तुला काय देऊ?’

‘मला पैशाचा मोबदला नको. अपण असे ठरवू या. बारा वर्षेपर्यत मी तुम्ही जे-जे सांगाल ते करीन. जे-जे मागाल ते देईन. बारा वर्षे मी तुमचा गुलाम आणि बारा वर्षे संपली, बाराव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे रात्रीचे बारा वाजले की, तू माझा गुलाम व्हायचेस. कायमचा गुलाम. आहे कबूल?’

‘असा कालावधीचा करार नको. तुम्ही मला सुखे देत राहा, निरनिराळे अनुभव देत राहा. ज्या वेळेस ‘हा क्षण किती सुंदर, हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो’ असे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडतील, त्या वेळेस मी तुमचा गुलाम होईन, पटले का तुम्हाला?’’

‘ठीक. म्हणतोस तसे का होईना! ठरले. आजपासून मी तुझा बंदा सेवक. मला वाटेल ते सांग, माझ्याजवळ वाटेल ते माग.’
‘मला जगाचा अनुभव नाही. तूच मला जे-जे योग्य असेल ते देत जा.

माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडतील अशी खटपट कर.’

‘बरे तर. मी आरंभ करतो. मीट डोळे, डोळे मीट.’

‘परंतु तुझे नाव सांग.’

‘माझे नाव सैतान.’

‘सैतान तो का तू वा, छान! मिटू डोळे? हे बघ मिटले.’ माधवाने डोळे मिटले. सैतान त्याला दूर घेऊन गेला.

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
दोघांचा बळी 1 दोघांचा बळी 2 दोघांचा बळी 3 फुला 1 फुला 2 फुला 3 फुलाला फाशीची शिक्षा 1 फुलाला फाशीची शिक्षा 2 फुलाला फाशीची शिक्षा 3 फुलाला फाशीची शिक्षा 4 फुलाला फाशीची शिक्षा 5 फुलाला फाशीची शिक्षा 6 राज आला, फुला वाचला 1 राज आला, फुला वाचला 2 राज आला, फुला वाचला 3 राज आला, फुला वाचला 4 समुद्रकाठच्या तुरुंगात 1 समुद्रकाठच्या तुरुंगात 2 समुद्रकाठच्या तुरुंगात 3 तुरुंगातील प्रयोग 1 तुरुंगातील प्रयोग 2 तुरुंगातील प्रयोग 3 तुरुंगातील प्रयोग 4 तुरुंगातील प्रयोग 5 तुरुंगातील प्रयोग 6 तुरुंगातील प्रयोग 7 तुरुंगातील प्रयोग 8 फुलाला दोन बक्षिसे 1 फुलाला दोन बक्षिसे 2 फुलाला दोन बक्षिसे 3 फुलाला दोन बक्षिसे 4 घरी 1 देवाचा दरबार 1 देवाचा दरबार 2 सर्वज्ञ माधव 1 सर्वज्ञ माधव 2 असमाधान 1 असमाधान 2 सैतानाशी करार 1 सैतानाशी करार 2 प्रेमाचा पेला 1 प्रेमाचा पेला 2 मधुरीची भेट 1 मधुरीची भेट 2 मधुरीची भेट 3 मधुरीची भेट 4 मधुरीची भेट 5 मधुरीची भेट 6 मधुरीची भेट 7 मधुरीची भेट 8 दु:खी मधुरी 1 दु:खी मधुरी 2 दु:खी मधुरी 3 दु:खी मधुरी 4 ती काळरात्र 1 ती काळरात्र 2 ती काळरात्र 3 ती काळरात्र 4 ती काळरात्र 5 राज्याच्या दरबारात 1 राज्याच्या दरबारात 2 राज्याच्या दरबारात 3 पुन्हा घरी 1 पुन्हा घरी 2 पुन्हा घरी 3 स्वर्गात 1