सर्वांत प्राचीन खेळ
भारताने अनेक खेळांना जन्म दिला आहे. यामध्ये सापशिडी, बुद्धिबळ, पत्ते, रथांची शर्यत, नौकांची शर्यत, बैलगाडी शर्यत इत्यादी. बुद्ध देखील धनुस्रदार आणि रथांच्या शर्यतीत माहीर होते. यापैकी ४ खेळांचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. ते आहेत बुद्धिबळ, द्यूत - फासे, गोळा फेक आणि कुस्ती. आखाड्यांचा इतिहास इ. स. पु. २५०० सांगितला जातो तर ते पूर्ण रूपाने ८ व्या शतकात अस्तित्वात आले होते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात आपल्याला चौसर फासे, गोट्या इत्यादी सापडले आहे.