Get it on Google Play
Download on the App Store

सर्वांत प्राचीन ज्ञान शैली


आयुर्वेद भारतातील सर्वांत प्राचीन चिकित्सा शैली आहे. २५०० वर्षांपूर्वी चरक ने आयुर्वेदाचा विकास केला होता. त्यानंतर युनानी आणि नैसर्गिक चिकित्सेचा उगम झाला. शल्य चिकित्सेसाठी (शस्त्रक्रिया) आपण आज देखील सुश्रुतला श्रेय देतो. विश्वातील सर्वांत प्राचीन भाषा संस्कृतचे व्याकरण पाणिनीने इ. स. पु. २०० मध्ये लिहिले होते. भास्कराचार्यांनी खगोलशास्त्राच्या संशोधनाच्या जवळ जवळ १०० वर्ष आधी ही गोष्ट निश्चित सांगितली होती की पृथ्वी सूर्याच्या भोवती फेरी मारते आणि असे करण्यासाठी तिला ३६५.२५८७५ दिवसांचा अवधी लागतो.