Get it on Google Play
Download on the App Store

सर्वांत प्राचीन मंदिर


तसे पाहिले तर भारतात अनेक प्र्राचीन मंदिरे आणि पूजा स्थाने आहेत परंतु तुम्हाला हे माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल की त्यापैकी सर्वांत प्राचीन मंदिर कुठले आहे. अजंठा, वेरूळ, ब्रिहदेश्वर मंदिर, तिरुपती मंदिर यांच्यापेक्षा देखील प्राचीन आहे बिहार येथील मुंडेश्वरी देवीचे मंदिर. असे मानले जाते की हे मंदिर इसवीसन १०८ मध्ये निर्माण केले गेले. या मंदिरात शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. या व्यतिरिक्त सर्व शक्तिपीठे उदा. ज्वाला मंदिर, कामाख्या मंदिर, अमरनाथ इत्यादी देखील फार प्राचीन मानली जातात. सोमनाथ मंदिराचा उल्लेख ऋग्वेदात पाहायला मिळतो जो ७००० वर्षांपूर्वी लिहिला गेला. दरम्यानच्या काळात अनेक वेळा ही मंदिरे उध्वस्त केली गेली परंतु तरी देखील आजही त्यांची शान, रुबाब कायम आहे.