पायांबाबत

१. जर एखाद्या पुरुषाच्या पायाची तर्जनी (अंगठ्याच्या बाजूचे बोट) अंगठ्यापेक्षा मोठी असेल तर अशा व्यक्ती स्त्री-सुख प्राप्त करणाऱ्या असतात.
२. जर एखाद्या पुरुषाचे पाय कोमल, मांसल म्हणजेच भरलेले, रक्तवर्ण म्हणजेच लाल रंगाचे असतील आणि ज्यांच्या पायाला घाम येत नाही, ते सर्व सुख - सुविधा प्राप्त करणारे असतात. असे लोक एकदम आरामशीर जीवन व्यतीत करतात.
३. जर एखाद्या पुरुषाच्या पायाचे अंगठे खूपच मोठे दिसत असतील तर त्यांना भाग्याची साथ मिळू शकत नाही.
४. जर एखाद्या पुरुषाचे पाय पांढरे, सुकट, वाकड्या नखांचे असतील आणि त्याची बोटे सुद्धा असमान असतील तर अशा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात आर्थिक चणचण नेहमी राहते.
५. जर एखाद्या पुरुषाच्या पायाची करंगळी ही अंगठ्याच्या पेक्षा मोठी असेल तर असे लोक खूप धनिक असतात.