महत्त्व आणि उपयुक्तता
शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते.
शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे. शंखात शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात.
दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.
दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.