पूजेच्या वेळी घ्यावी काळजी
कासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो ? कासवाचं मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा ? शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरुन ठेवुनच्या देवपुजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी.
शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. (वेळ अन ताकद कुणालाय उगाळत बसायची? शिवाय चंदनही किति महाग आहे?) तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे.कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये