१४ रत्नांपैकी एक आहे शंख
देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे. देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे.पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.