मत्स्य पुराण
मत्स्य पुराणात २९० अध्याय आणि १४००० श्लोक आहेत. या ग्रंथात मत्स्य अवताराच्या कथेचे विस्ताराने वर्णन कलेले आहे. सृष्टीची उत्पत्ती, आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह, चारही युगे आणि चंद्रवंशी राजांचे इतिहास वर्णिलेले आहेत. कच, देवयानी, शर्मिष्ठा आणि राजा ययातीची रोचक कथा देखील याच पुराणात आहे.