भागवत पुराण
भागवत पुराणात १८००० श्लोक आणि १२ स्कंध आहेत. या ग्रंथामध्ये अध्यात्मिक विषयांवर चर्चा आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे महात्म्य दर्शविलेले आहे. विष्णू आणि कृष्णावताराच्या कथांव्यतिरिक्त महाभारत काळापासून पूर्वेचे अनेक राजे, ऋषीमुनी आणि असुर यांच्या कथा देखील संकलित आहेत. या ग्रंथामध्ये महाभारत युद्धाच्या नंतर श्रीकृष्णाचा देहत्याग, द्वारका नगरी जलमय होणे आणि यदुवंशाचा नाश इत्यादींचे देखील विवरण केलेले आहे.