ब्रह्म वैवर्त पुराण
ब्रम्ह वैवर्त पुराणात १८००० श्लोक आणि २१८ अध्याय आहेत. या ग्रंथात ब्रम्हा, गणपती, तुळस, सावित्री, लक्ष्मी, सरस्वती आणि कृष्णाचे महात्म्य दर्शविण्यात आलेले आहे आणि त्यांच्याशी निगडीत कथांचे संकलन आहे. या पुराणात आयुर्वेदाशी संबंधित ज्ञान देखील संकलित आहे.