Get it on Google Play
Download on the App Store

नारद पुराण


https://images.shimply.com/1813/13953726/original.jpg?1454778927

नारद पुराणात २५००० श्लोक आहेत आणि त्याचे दोन भाग आहेत. या पुराणात सर्व १८ पुराणांचे सार किंवा सारांश देण्यात आला आहे. प्रथम भागात मंत्र आणि मृत्युच्या पश्चातचे क्रम इत्यादींची विधाने आहेत. गंगा अवतरणाची कथा देखील विस्ताराने दिलेली आहे. दुसऱ्या भागात संगीतातील सातही स्वर, साप्तकाची मंद्र, मध्य आणि तार किंवा तीव्र स्थाने, मूर्छना, शुद्ध आणि कोमल ताना आणि स्वरमंडलाचे ज्ञान लिहिलेले आहे. संगीत पद्धतीचे हे ज्ञान आजही भारतीय संगीताचा आधार आहे. जे पाश्चात्य संगीताच्या झगमगाटाने चकित होतात त्यांच्यासाठी उल्लेखनीय तथ्य हे आहे की नारद पुराणाच्या कित्येक शतकांच्या नंतर देखील पाश्चात्य संगीतात केवळ ५ स्वर होते आणि संगीताच्या थिअरीचा विकास जवळ जवळ शून्याच्या बरोबर होता. मूर्छनांच्या आधारेच संगीताच्या पट्ट्या (scale) बनलेल्या आहेत.