विष्णु पुराण
विष्णू पुराणात ६ अंश आणि २३००० श्लोक आहेत. या ग्रंथात भगवान विष्णू, ध्रुव बाळ आणि कृष्णावताराच्या कथा संकलित आहेत. याशिवाय सम्राट पृथूची कथा देखील समाविष्ट आहे, सम्राट पृथु ज्याच्यामुळे आपल्या धरतीचे नाव पृथ्वी असे पडले. या पुराणात सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजांचा इतिहास आहे. भारताची राष्ट्रीय ओळख खूप प्राचीन आहे ज्याचे प्रमाण विष्णू पुराणाच्या या श्लोकावरून मिळते : उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद भारतं नाम भारती यत्र सन्ततिः। (सामान्य शब्दात याचा अर्थ आहे की असे भौगोलिक क्षेत्र ज्याच्या उत्तरेला हिमालय आहे आणि दक्षिणेला जो प्रदेश समुद्राने घेरलेला आहे, भारत देश आणि त्यात राहणारे सर्वजण भारत देशाची संतती आहे). भारत देश आणि भारतवासी यांची याहून ठळक ओळख आणखी कोणती असू शकते? विष्णू पुराण प्रत्यक्षात एक ऐतिहासक ग्रंथ आहे.