अग्नि पुराण
अग्नी पुराणात ३८३ अध्याय आणि १५००० श्लोक आहेत. या पुराणाला भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोष (एनसायक्लोपीडिया) म्हणता येईल. या ग्रंथात मत्स्यावतार, रामायण आणि महाभारताच्या संक्षिप्त कथा देखील संकलित आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक विषयांवर चर्चा आहे. ज्यामध्ये धनुर्वेद, गांधर्व वेद आणि आयुर्वेद हे मुख्य आहेत. धनुर्वेद, गांधर्व वेद आणि आयुर्वेद यांना उप-वेद असे देखील म्हटले जाते.