वराह पुराण
वराह पुराणात २१७ स्कंध आणि १०००० श्लोक आहेत. या ग्रंथात वराह अवताराच्या कथेव्यतिरिक्त भागवत गीता महामात्या चे देखील विस्तृत स्वरुपात वर्णन केलेले आहे. या पुराणात सृष्टीचा विकास, स्वर्ग, पाताळ तसेच अन्य लोकांचे वर्णन देखील दिलेले आहे. श्राद्ध पद्धत, सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन, अमावस्या आणि पौर्णिमेच्या कारणांचे वर्णन आहे. महत्त्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय तथ्य या पुराणात संकलित आहेत त्याच गोष्टी आणि शोध पाश्चात्य जगतातील शास्त्रज्ञांना पंधराव्या शतकाच्या नंतर समजल्या होत्या.