बत्ताशे किंवा गूळ
ही देखील दिवाळीसाठी शुभ सामग्री आहे. लक्ष्मी पूजनाच्या नंतर गूळ किंवा बत्ताशे यांचे दान केल्याने धनवृद्धी होते. घर-परिवारात सुख-समृद्धी नांदते. यामुळेच प्रसादाच्या स्वरुपात बत्ताशे देवाला अर्पण केले जातात. पूजेच्या नंतर बत्ताशे किंवा मिठाई अन्य लोकांना देखील वाटली पाहिजे, जेवढ्या जास्त लोकांपर्यंत आपण प्रसाद पोचवतो, तितके जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होते. यामागील एक भाव असाही आहे की दिवाळीच्या वेळी गोड खून सर्वांची तोंडे गोड व्हावीत आणि सर्वांचे मन प्रसन्न राहावे.