अक्षत किंवा अक्षता
जुन्या काळापासूनच पूजेच्या वेळी अक्षतांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तांदळाला अक्षत म्हटले जाते म्हणजे जो खंडित नाही असा. या कारणाने अक्षतांना पूर्णत्वाचे प्रतिक मानले जाते. धार्मिक कार्यांच्या वेळी अक्षता एका धनाच्या स्वरुपात देखील वापरल्या जातात. पूजेत अक्षता ठेवण्याच्या संबंधात एक मान्यता अशी आहे की अक्षता आपल्या घरावर एकही डाग लागू देत नाहीत म्हणजेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढवतात. टिळा लावताना देखील अक्षतांचा वापर केला जातो यामागील कारण असे आहे की टिळा लावून घेणाऱ्या व्यक्तीला घर-परिवार आणि समाजात पूर्ण मन-सन्मान प्राप्त व्हावा.