एप्रिल
या नावाची उत्पत्ती लैटिन शब्द 'एस्पेरायर' पासून झाली. याचा अर्थ आहे उघडणे, फुलणे. रोम मध्ये याच महिन्यात कळ्या उमलून त्यांची फुले बनत असत म्हणजेच वसंत ऋतूचे आगमन होत असे त्यामुळे आधी याचे नाव एप्रिलीस ठेवण्यात आले. त्यानंतर वर्षात केवळ १० महिने असल्यामुळे हा महिना वसंत ऋतूपासून खूप दूर होत गेला. वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या खऱ्या भ्रमणाची माहिती जगाला दिली तेव्हा वर्षात २ महिने आणखी जोडून एप्रीलीसचे नाव पुन्हा सार्थ करण्यात आले.