धीरूभाई अंबानी
आपल्या भावासोबत मुंबईत रिलायन्स कंपनी स्थापन करणारे धीरजलाल हिराचंद अंबानी हे भारतीय उद्योजक होते. द संडे टाइम्स टॉप ५० बिसनेसमन इन एशिया मध्ये त्यांना समाविष्ट केलेले होते. १९७७ मध्ये रिलायन्स कंपनी अंबानींनी लोकांसमोर आणली आणि २००७ पर्यंत अंबानी कुटुंबाचे उत्पन्न ६० अब्ज होते ज्याने ह्या कुटुंबाला जगातील अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोचवले.