Android app on Google Play

 

कर्सनभाई पटेल

http://hindispot.com/wp-content/uploads/2015/06/karsanbhai-patel.jpg

कर्सनभाई खोदीदास पटेल (जन्म १९४५, रुप्पूर, मेहसाना, गुजरात) हे भारतीय उद्योजक आणि २५०० करोडच्या साबण, पावडर तसेच सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या निर्मा ग्रुपचे संस्थापक आहेत. फोर्ब्सने २००५ साली त्यांचं उत्पन्न ६४० दशलक्ष इतकं दाखवलं आहे. त्यांना शिक्षणात रस आहे व बऱ्याच फार्मसी (निर्मा इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी), अभियांत्रिकी( निर्मा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉज) महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांना के.के. पटेल असेही म्हटले जाते.