जमनालाल बजाज
जमनालाल बजाज हे भारतीय उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. ते महात्मा गांधींचे सहाय्यक आणि अनुयायी होते, गांधीजींनी त्यांना आपला मुलगा म्हणून दत्तक घेतल्याचेही ज्ञात आहे. त्यांनी १९२६ साली बजाज ग्रुपची स्थापना केली. ह्या ग्रुपच्या २४ कंपन्या आहेत ज्यात ६ सूचीबद्ध कंपन्या आहेत.