ख्वाजा अब्दुल हमीद
ख्वाजा अब्दुल अली आणि मसूद जहा/ जहान बेगम यांना अलीगडमध्ये ३१ ऑक्टोबर १८९८ रोजी झालेला मुलगा म्हणजे ‘डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद’. १९३५ मध्ये भारतातील जुन्या औषधक्रियांसंबंधीच्या सिप्ला कंपनीचे संस्थापक असलेले ते भारतीय राष्ट्रवादी आणि साम्राज्यशाहीला विरोध करणारे वैज्ञानिक होते. त्यांचे चिरंजीव युसुफ हमीद यांनी त्यांच्यानंतर पुढील 52 वर्षे कंपनीची धुरा सांभाळली.