जगदीशचंद्र महिंद्रा
जे.सी.महिंद्रा म्हणून ओळखले जाणारे जगदीशचंद्र महिंद्रा हे भारतीय उद्योजक आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीचे सहसंस्थापक होते, १९४५मध्ये के.सी. महिंद्रा आणि मुलिक गुलाम मोहम्मद यांच्यासोबतीने जे.सी. महिंद्रांनी भारतातील मुंबई येथे या कंपनीची स्थापना केली. लोखंडी व्यापार म्हणून स्थापन झालेल्या ह्या कंपनीने सध्या शेतीव्यवसायापासून ते अंतरीक्ष प्राद्योगिकीपर्यंत सगळ्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. आनंद महिंद्रा हे सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संस्थापक आहेत.