Get it on Google Play
Download on the App Store

अबोल प्रेम


रोज तोच बस स्टॉप

रोजची तीच बस

रोज तू माझी  वाट पाहतेस

माझ्याकड़े पाहून एकदा तरी हस

लाजरी आहेस साजरी वाटतेस

मीही आहे थोडा बुजरा

म्हणुनच परवा 

तुझ्यासाठी आणलेला 

अबोलीचा  गजरा

तसाच आहे पडून माझ्या bag मध्ये 

सुकलाय थोडासा पण 

अजून पूर्णपणे कोमेजला नाही

तुझ्या केसात माळल्याशिवाय

तुझा  गंध  त्याच्या सुगंधात  

मिसळल्याशिवाय

मरणार नाही, कोमेजणारहि  नाही

अबोलीचा गजरा आणि आपलं अबोल प्रेम