Get it on Google Play
Download on the App Store

शूरवीर

आजकाल प्रत्येकजण 
लढतो लुटूपुटूची लढाई 
तरीही मारतो बढाई 
शूरवीर योध्दा असल्याच्या 
काही शूर अर्जुन असतात 
तर बरेच जण अभिमन्यू असतात 
चक्रव्युहात उडी तर घेतात 
पण बाहेर येणं कुठे जमत? 
बिचारे अडकून पडतात