रचना
नाजुकशी वेल
बिलगते झाडाला
आधारासाठी
त्याच्या भरदार खोडाला
सोसाट्याचा वारा
धोधो पाउस
घोंगावणारे वादळ
कडकडीत ऊन
राहतं झाडसुद्धा
स्थितप्रज्ञ उभं
करतं सगळ्या
सगळ्याचा सामना
का कोण जाणे
पण अशीच केल्ये रचना
त्या विधात्याने
नाजुकशी वेल
बिलगते झाडाला
आधारासाठी
त्याच्या भरदार खोडाला
सोसाट्याचा वारा
धोधो पाउस
घोंगावणारे वादळ
कडकडीत ऊन
राहतं झाडसुद्धा
स्थितप्रज्ञ उभं
करतं सगळ्या
सगळ्याचा सामना
का कोण जाणे
पण अशीच केल्ये रचना
त्या विधात्याने