Get it on Google Play
Download on the App Store

गणिताचा पेपर


http://resultncutoff.in/wp-content/uploads/2015/03/maths-ftr.jpg

गणिताचा पेपर सोडवताना 
गरज असते उत्तम सरावाची 
बेरजा, वजाबाक्या गुणाकार 
आणि भागाकाराची 
सूत्रे, प्रमेये आणि सिध्दांत 
यांचा आधार घेण्याची 
प्रसंगावधान आणि 
समय व्यवस्थापनाची 
अ गटातील गणिते सोपी 
हमखास आधी सोडवावीत 
नंतर क्रमाने ब आणि क 
गटातील गणिते सोडवावीत 
ड गटातील गणिते 
जमल्यास सोडवावीत 
या अक्षरांचा क्रम 
शक्यतो पाळावाच 
त्यामुऴे किमान अ ब आणि क 
गटांचे गुण प्राप्त होतात 
ड गटातील काही गणिते 
न सुटणारी असतात 
ती सोडून देण्याव्यतिरीक्त 
इतर पर्याय नसतो