छवि राजावत
३० वर्षांच्या छवि राजावत हिने नोकरी असलेले चकाचक ऐषारामी आयुष्य सोडून आपले गाव सोडा याची सरपंच बनणे स्वीकार केले. दिल्ली इथल्या लेडी श्रीराम कॉलेज ची पदवीधर आणि आय. आय. एम. एम. पुणे इथली एम.बी.ए. ची डिग्री मिळवल्यानंतर छवि राजावत हिने अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. त्यानंतर मात्र आपले आजोबा रघुबीर सिंघ यांचे अनुकरण करत सरपंच बनण्याचा निर्णय घेतला. आय.बी.एन. लाइव्ह ने केवळ ३० वर्षांची असताना तिला यंग इंडियन लीडर चा पुरस्कार दिला.