रस्सुन्दारी देवी
रस्सुन्दारी देवी यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता. ६० वर्षांच्या असताना त्यांनी आपले आत्मवृत्त बंगाली मध्ये लिहिले. त्यांचे पुस्तक अमर जीबन एखाद्या भारतीय महिलेकडून लिहिले जाणारे पहिले आत्मवृत्त आहे. रस्सुन्दारी देवी एका जमीनदार घराण्यातील महिला होत्या. त्या काळी लोकांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की जर एखादी स्त्री लिहा-वाचायला शिकली तर तिचा पती मरण पावेल आणि ती स्त्री विधवा होईल. असे असूनही त्यांनी आपल्या विवाहानंतर स्वतःला लिहा-वाचायला शिकवले.