टाफोफोबिया - जिवंत गाडले जाण्याची भीती
जिवंत गाडले जाण्याची भीती म्हणजे चुकीने मृत घोषित होऊन कबरीत गाडले जाण्याची भीती. या भीतीला सर्वसामान्यतः टाफोफोबिया असे म्हणतात. आधुनिक चिकित्सेची सुरुवात होण्यापूर्वी ही भीती अगदीच अकारण नव्हती. इतिहासात कित्येक अशा घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये चुकून जिवंत माणसाना गाडण्यात आले आहे.