दिप्नोफोबिया - रात्री च्या जेवणाच्या दरम्यान बोलण्याची भीती
काही खाताना किंवा जेवताना गप्पा मारणे हीच खरी मेजवानी असते. परंतु काही लोक जेवताना किंवा खाताना दुसऱ्या माणसांशी बोलायला इतके घाबरत असतात की ते कधी बाहेर जेवायला जायला देखील तयार होत नाहीत. पूर्वीच्या काळी समाजात जेवणाच्या शिष्टाचाराचे काही नियम असे होते कि ते अशा स्थितीतील माणसाला काही प्रमाणात मदत करायचे. परंतु आताशा हे सगळे नियम लोक हळू हळू विसरत चालले आहेत. आजकालच्या समाजात जिथे नियम आणि शिष्टाचार यांचे पालन होणे कमी झालंय, कदाचित पार्ट्यांवर मर्यादा येण्याचे हेच खरे कारण असू शकेल.