Android app on Google Play

 

पिडीयोफोबिया - बाहुल्यांची भीती

 बाहुल्यांची अगदी विनाकारण वाटणारी भीती म्हणजे पिडीयोफोबिया. फक्त भीतीदायक दिसणाऱ्या बाहुल्याच नव्हे तर सर्व बाहुल्यांची भीती. प्रत्यक्षात ही भीती कोणत्याही प्राण्याच्या किंवा वस्तूच्या सजीव रूपातून निर्माण होते आणि म्हणूनच यात रोबोट आणि मन्ने क्वीन यांचाही समावेश आहे, ज्यामुळे दुकानामध्ये जाणं देखील मुश्कील होऊन जाऊ शकतं. सिग्मंड फ्राईड च्या म्हणण्याप्रमाणे हा आजार या विचारातून जन्म घेतो की, 'कदाचित बाहुल्या जिवंत तर होणार नाहीत ना?'