Android app on Google Play

 

रूस चा इवान IV

 


रूस चा इवान IV १५३३ ते १५४७ पर्यंत मुस्कोव्य चा ग्रान्ड ड्यूक होता आणि रूस चा सर्वात पाहिला शासनकर्ता आणि तसार होता. ऐतीहसिक सूत्रांमध्ये इवान च्या विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगवेगळे आडाखे आहेत. काही लोक त्याला बुद्धिमान आणि विश्वास ठेवण्या योग्य मानतात तर काही त्याला रागीट, भडकू आणि मानसिक आजारांनी ग्रस्त मानतात. तो हजारो लोकांना कढई मध्ये भाजून आनंद घ्यायचा आणि असंख्य लोकांना सुळावर चढवायचा. इवान च्या सैनिकांनी संपूर्ण शहरा भोवती उंच भिंती बांधल्या होत्या, जेणेकरून लोकांना तिथून पळून जाता येणार नाही. दर दिवशी सैनिक ५०० ते १००० लोकांना पकडून एकत्र करून इवान आणि त्याच्या मुलासमोर त्यांचे हाल हाल करून त्यांना मारून टाकत असत. इवान चा मृत्यू बोगदान बेल्स्क्य सोबत बुद्धिबळ खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला.