Get it on Google Play
Download on the App Store

अत्तिला द हुन


अत्तिला द हुन ४३४ ते ४५३ पर्यंत हून चा राजा होता. तो हुन्निक साम्राज्याचा शासक होता. हे साम्राज्य उरल नदी ते बाल्टिक समुद्र असं पसरलेलं होतं. त्याला इतिहासातील सर्वांत मोठा खलनायक म्हणून मानलं जातं. पश्चिम युरोप मधे तर त्याला क्रौर्य आणि उत्पीडनाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. त्याने २ वेळा डेन्यूब पार केलं परंतु तरी देखील कोन्स्तान्तिनोप्ले वर कबजा करू शकला नाही. नंतर त्याने इटली वर हल्ला केला आणि इटली च्या उत्तरेकडील सीमा नष्ट केल्या. परंतु रोम वर कबजा करू शकला नाही. ४५२ मध्ये तो अर्ध्यावरून इटली लुटत घरी परत आला, परंतु ४५३ मध्ये आपल्या विवाहाच्या रात्री अती मद्यपान केल्यामुळे त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरु झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.