इदी अमीन दादा
आतापर्यंत च्या सर्वात क्रूर शासकांपैकी इदी अमीन दादा हा १९७१ ते १९७९ पर्यंत युगांडा चा शासक आणि राष्ट्रपती राहिला आहे. इदी अमीन दादा युगांडा च्या सेने चा कमांडर होता जेव्हा त्याने १९७१ च्या जानेवारी महिन्यात सेना अभियानात सत्ता काबीज केली. नंतर त्याने स्वतःला फील्ड मार्शल ही पदवी बहाल केली आणि राज्यावर सत्ता देखील करत राहिला. त्याच्या सत्तेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे मानवी अधिकारांचं हनन, राजनैतिक दडपशाही, जातीय छळवणूक, न्यायालयीन हत्या आणि युगांडा मधून भारतीयांचे उच्चाटन ही होत. आकडेच बघायचे झाले तर साधारण ८०,००० ते ५,००,००० इतके लोक मारले गेले. इदी अमीन दादा याला शेवटी पराभूत करण्यात आलं, परंतु स्वतःच्या मृत्यू पर्यंत तो असंच मानत राहिला की युगांडा ला त्याची गरज आहे आणि त्याला आपल्या कर्मांबद्दल कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप वाटत नव्हता. २० जुलै २००३ रोजी त्याचा जेद्दाह, सौदी अरेबिया इथे किडनी खराब झाल्या कारणाने मृत्यू झाला