Android app on Google Play

 

व्लेड तेपेस

 


व्लेड |||, वाल्लाचिया चा राजकुमार, ज्याला आपल्या शत्रूला सुळावर चढवून मारण्यासाठी ओळखलं जातं, तो १४५६ ते १४६२ पर्यंत वाल्लाचिया चा शासनकर्ता होता. व्लेड ला आपल्या शासन काळात अत्यंत क्रूर शिक्षा देण्यासाठी ओळखण्यात येतं. तो क्रूरता आणि अत्याचाराच्या कोणत्याही थराला जाऊ शकत होता, ज्यामध्ये शरीराचे अवयव काढणे, चेहरा कुरतडणे असे भयानक प्रकार सामील होते. तो हजारो लोकांचा छळ करत त्यांना अतिशय यातना देत असे. एवढेच नव्हे, तर प्रेतांच्या खचात मधोमध बसून हा विक्षिप्त क्रूरकर्मा आपलं जेवण - खाण उरकत असे. त्याने अमला शहरातील जवळ जवळ २०००० पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांना देखील सुळावर चढवलं. व्लेड ने लोकांना चामडी सोलणे, शरीराचे अवयव तोडणे, उकळत्या पाण्यात किंवा तेलात टाकणे, हात - पाय तोडणे, डोळे फोडणे, गळा आवळणे, फाशी देणे, भाजणे, जाळणे, ठेचणे, चिरडणे, भोसकणे, सुळावर चढवणे, जिवंत गाडणे, चाकूचे वार करणे अशा असंख्य क्रूर प्रकारांनी मरण यातना दिल्या. हात, पाय, नाक, कान आणि गुप्तांग कापून टाकणे या त्याच्या सर्वात आवडत्या शिक्षा होत्या.