Get it on Google Play
Download on the App Store

हर एक दोस्त जरूरी होता है…

kayvatelteबरेच मित्र असतात आपले. काही चांगले काही वाईट, तर काही खूप चांगले. प्रत्येक मित्र हा एक वेगळ्या प्रकारचा असतो, कुठलेही दोन मित्र एकसारखे कधीच सापडत नाही. प्रत्येक मित्रा मध्ये एक युनिक क्वॉलिटी असते. मित्रांचं ऍनॅलिसिस करावे असे कधीच वाटत नाही, पण ते आपोआप सुरु होतं ते एखाद्या मित्राने मित्र म्हणून खांद्यावर हात ठेऊन पाठीत सुरा खुपसल्यावर. असो.

अगदी नर्सरी पासून मित्र हा कन्सेप्ट सुरु होतो. मुल नुकतंच घराबाहेर पडलेले असते, नेहेमी आईच्या प्रोटेक्शनची सवय असते, पण एकदम जेंव्हा ज्यु. केजी मधे जायची वेळ येते, तेंव्हा आधी तर आईचा आधार शिक्षकांमध्ये शोधायचा ते मुल प्रयत्न करते, पण एक शिक्षक वर्गातल्या ६० मुलांना कसा पुरणार? मग बरोबरच्या मुला- मुलींशी मैत्री होते – ते पण एक गरज म्हणून!

वय वाढत जातं, आणि मग पौगंडावस्थेत पोहोचल्यावर तर नातेवाईकांपेक्षाही मित्र जास्त जवळचे वाटायला लागतात. मित्राच एक वेगळं विश्व तयार होतं.सध्या टिव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणे प्रत्येक मित्र हा युनिक सॅंपल असतो . प्रत्येकाची कॅटॅगरी, वागण्याची पद्धत एकदम वेगळी असते. कधी आपल्या मित्रांचे ऍनॅलिसीस केले आहे का? एक मेल आली होती, मित्र कसे नसावे याची काही दिवसापूर्वी!

गरजू:- हा पहिला प्रकार . ह्याला जेंव्हा पैशाची गरज पडते, तेंव्हा तो तुमच्या कडे येतो, आणि बराच वेळ गप्पा मारल्यावर अडचण आहे म्हणून पैसे मागतो. तुम्ही पैसे दिल्यावर, याची आणि तुमची भेट एकदम तो पैसे परत करायला येतो तेंव्हाच होते. एकदा पैसे परत केले, की नेक्स्ट भेट पुन्हा त्याला गरज पडेल तेंव्हाच!

खरा मित्र :- हे तुमचे अगदी खास जवळचे मित्र असतो आणि तुमच्या चांगल्या वाईट प्रसंगात तुमच्या बरोबर ( तुम्ही न बोलावता )असतो. असे फार कमी मित्र असतात.

त्रासदायक मित्र :- हे मित्र तुम्हाला कायम कुठल्या तरी लफड्यात अडकलेले असतात. आणि तुम्हाला पण अडकवतात. जसे मुलगी ह्याने पटवली असते, पण पळून जाऊन लग्न करायला तुमची कार हवी…. :)

जुने शाळेतले / कॉलेज मधले मित्र :- मौल्यवान! ह्यांच्याशी तुम्ही कधीही गप्पा मारायला बसाल तर वेळ कसा जाईल ते समजणार नाही. तुमच्या जीवनातला बहुमूल्य ठेवा असतात हे मित्र!

फोनाळ मित्र : – ह्यांच्याकडे तुम्हाला भेटायला अजिबात वेळ नसतो, पण फोन वर मात्र तुमच्याशी हे तास अन तास गप्पा मारतात. तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात, पण भेट मात्र टाळतात. भेट मात्र अगदी कधी तरी होते, ती पण योगायोगानेच – ठरवून नाही!

एक्स्ल्युझिव मित्र :- यांची अपेक्षा असते की तुम्ही फक्त यांच्याबरोबरच मैत्री करावी. त्यांना न आवडणाऱ्या मुला- मुलींशी तुम्ही अजिबात मैत्री करू नये अशी यांची अपेक्षा असते. ( उदाहरणार्थ:- जर तुम्ही पुरुष असाल तर मैत्रिण अशी असते).

कुबेर मित्र :- हे म्हणजे पैशाची खाण असलेले मित्र असतात. यांना तुम्ही कधीही पैसे मागितले तरी पण ह्यांच्याकडे तयार असतात . एक फोन केला की पंधरा मिनिटात तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर करतात. पैसे देतांना पण आपण काही उपकार करतोय अशी भावना यांची नसते, त्यांच्या दृष्टीने ही एक सामान्य घटना असते.

कंजूस मित्र:- वर दिलेल्या कुबेर मित्रांच्या अगदी विरुद्ध यांची वागणूक असते, कधी पैसे मागितले, तर मिळण्याचे चान्सेस कमीच! जवळ असूनही शक्यतो देणार नाहीत. जर कधी खूपच गळी पडलात, तर परत कधी देणार? मला पण पैशाची गरज आहे वगैरे वगैरे दहा गोष्टी सांगून मग पैसे देणार हे तुम्हाला.जर कधी पैसे दिलेच तर इतर दहा मित्रांना पैसे दिले आहेत ही गोष्ट रंगवून सांगणार.

त्रासदायक मित्र : – हे कायम कुठल्या ना कुठल्या तरी लफड्यात अडकलेले असतात. यांना तुम्ही कधीही भेटला किंवा फोन केला तरी पण हे मित्र तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम्सचा पाढा वाचून दाखवतात , आणि तुमच्याही नकळत तुम्हाला त्यांच्या प्रॉब्लेम मधे अडकवतात.. हे मित्र कसे ओळखायचे?? यांचा फोन आला, की तुमच्या कपाळावर चार आठ्या आपोआप तयार होतील , फोन उचलायच्या पूर्वी!

अदृष्य मित्र : – हा तुमचा चांगला मित्र असतो, पण तुम्हाला जेंव्हा कधी याची गरज पडते, तेंव्हा हा ह्याला कधीच वेळ नसतो. तुमच्या गरजेच्या वेळेस सोइस्कर पणे तुम्हाला टाळून इतर काही तरी करणार हा !

सहानुभूती दाखवणारे : -तुम्ही जेंव्हा खूप ’लो’ असाला, आणि तुम्हाला जर कोणाच्या तरी बरोबर आपले प्रॉब्लेम शेअर करायचे असतील तर हे मित्र उपयोगी पडतात. तुम्ही जे सांगाल ते सिंपथॅटिकली न कंटाळता ऐकतात. सायकॉलॉजिस्ट चा खर्च वाचवायला हे मित्र उपयोगी पडतात.

बडबड्या मित्र :- वर दिलेल्या सहानुभुती वाल्याच्या अगदी विरुद्ध . हा तुम्हाला अजिबात बोलू देणार नाही. स्वतःच इतकी बडबड करेल की जेंव्हा तुमची बोलायची वेळ येईल तेंव्हा तुम्ही स्वतः आपण काय बरं बोलणार होतो? हेच विसरून जाल.

संशयी मित्र : – तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी वर संशय घेणारे . सहजासहजी तुमच्यावर हे विश्वास ठेवत नाहीत.तुम्ही सांगितलं की मित्राबरोबर सिनेमाला गेलो होतो, तर हे तो मित्र होता की मैत्रिण?? हा प्रश्न नक्की विचारतील.यांना तुम्हाला यांची मैत्री नको आहे असाही संशय मनात असतो, आणि ते वेळोवेळी तुमच्याकडून तसे नाही -हे वदवून घेण्याचा प्रयत्न करतात.

स्वप्नभंजाळलेले :- हे मित्र तुमच्या कुठल्या स्वप्ना मधे ऍक्टीव्हली सहभागी होतात. जसे तुम्ही म्हंटले की ” मी बिझीनेस सुरु करतो” तर ताबडतोब हे मित्र तुमच्या बिझीनेस मधे स्वतःला पण सहभागी होऊन रुपरेषा तयार करणे सुरु करतात. :)

वार्षिक मित्र :- तुम्ही गावाकडे सुटी मधे गेलात आणि ह्यांना भेटलात की मधे एक वर्षाचा काळ गेला होता हे लक्षात पण येत नाही असे हे मित्र असतात. असेच काही मित्र तुम्ही रहाता त्याच शहरातले पण असू शकतात, यांची नियमीत भेट होत नसते, पण कधी भेट झाली की मधला काळ गेला होता हे विसरायला होते.

काळजीवाहू मित्र :- तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला की हे मित्र +व्ह अटीट्यूडने तुमचे मओधैर्य वाढवतात.प्रसंगी तुमच्या वतीने भांडण्यास पण हे उभे रहातात.

सल्लागार :- हे मित्र तुम्ही न मागता पण सल्ला देणयसाठी काय्म तयार असतात. तुम्ही कितीही नको नको म्हंटलं, तरीही हे सल्ला देणे काही बंद करत नाहीत.

नो रिप्लाय फेंड्स :- हे मित्र कधिच फोन उचलत नाहीत, तुम्हाला असा पण संशय येतो की ह्याचा नंबर तर बदललेला नसेल ना?? पण यांना काम पडले की मात्र यांचा फोन नक्की येतो.

गुप्त मित्र :_ हे तुमचे मित्र/मैत्रिण असतात, पण इतरांना ते कळू नये अशी यांची इच्छा असते. कधी रस्त्यावर भेटलात तर ओळख न दाखवता पण पुढे निघून जातात.

नो कॅटॅगरी :- हे तुम्हाला नेहेमी कुठला ना कुठला फेवर मागत असतात . असे कधीच होत नाही, की ह्यांची भेट झाली, आणि ह्यांनी काही मागितले नाही!

चिपकू:- कुठेही जातांना तुम्ही यांच्या सोबत जावे अशी अपेक्षा करतात, तुमच्या वेळेची यांना अजिबात किंमत नसते.

ब्लॉगर मित्र : – यांची कंपनी मस्त असते, पार्टी खादाडी ट्रेक या साठी बेस्ट! लिखाण हा कॉमन इंटरेस्ट असल्याने वेळ मस्त जातो , यांच्यासोबत असतांना.

आळशी मित्र :- तुमच्या कुठल्याही गृप च्या कार्यक्रमांना येण्याचा कंटाळा करणारे :)

फेसबुक फ्रेंड्स :- हे स्वतः कधीच फेसबुक वर अपडेट्स देत नाहीत, पण तुमचे अपडेट्स नेहेमी पहात असतात, त्यामुळे यांना तुमच्या बद्दल बरीच माहिती असते, पण तुम्हाला मात्र यांच्याबद्द्ल अजिबात काही माहिती नसते.

ऑप्टीमिस्ट:- तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम चे सोल्युशन यांच्याकडे असते

पेसिमिस्ट :- तुमच्या प्रॉबेम मधून तुम्ही कसे बाहेर पडू शकत नाही, आणि “आता तुमची वाट लागली आहे ” हे पटवून देण्याचे काम इमानेइतबारे करतात.

हुषार मित्र :- याला तुम्हाला काय हवे आहे हे आपोआप समजते आणि त्या प्रमाणे तो वागत असतो.

सायको :- तुम्हाला काही पॉब्लेम तर नाही ना? ही गोष्ट तुम्ही “काही प्रॉब्लेम नाही” हे उत्तर दिल्यावर पण हजारदा विचारतो, आणि शेवटी तुम्ही ओपन होत नाही म्हणून रुसुन बसतात . ( हे बहुतेक मुलगा असेल तर मैत्रिणीच्या बाबतीत घडते )

कलिग मित्र :- हे तुमचे मित्र नसतात, पण मित्र असल्याचा आभास निर्माण करण्यात एक्स्पर्ट असतात. ह्यांच्यापासून सांभाळून राहणेच योग्य.

कल्ला करणारे :- हे मित्र तुमच्या घरी येऊन तासाभराने परत गेल्यावर घर एकदम शांत वाटायला लागतं..

विसरभोळे :- तुमच्याकडून घेतलेले पुस्तक, पैसे वगैरे परत देण्याचे हमखास विसरणारे.

अजुनही बरेच प्रकार असतील पण इथे थांबवतो कारण तसाही लेख खूप मोठा झालाय. तुम्हाला काही सुचत असतील तर इथे नक्की लिहा कॉमेंट मधे.

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा.. मुली कशा पटवाव्या… ऐसे असावे संसारी बंदी घातलेली पुस्तकं.. चावट -वात्रट आणि आवाज. आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. लोकं लग्न का करतात? मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. एक कथा- १ एक कथा- २ कथा ३ द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) रोमॅंटीक आयडीयाज.. खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत? तिच्या मनातलं… नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… प्रेम.. भविष्य.. चवीने खाणार हैद्राबादला… कौतुक डायटींग करताय ??? तुका म्हणे.. हर एक दोस्त जरूरी होता है… दुःख… तुम्ही मुंबईकर आहात जर… पुणेरी पगडी… पुण्याचं रानमळा गमतीशीर म्हणी.. अब्रू ची किंमत किती आहे हो?? फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल नॅशनल शेम! झपाटलेले… फुलपाखरु तिच्या मनातलं…