Get it on Google Play
Download on the App Store

माझी बाहुली छान छान माझा...

माझी बाहुली छान छान

माझा बाहुला छान छान

चला चला बाहुला बाहुलीचे

लगीन करून देऊ त्यांचे

काउ आला चिऊ आली

पोपट आला माउ आली

घोडे दादा ससोबा आला

हत्ती दादा वाघोबा आला

पोपट म्हणाला मी गातो

सनई मधूर मि वाजवतो

नि हत्तीची कशी सोंड छान

सर्वाना करतो तो सलाम

ससोबा म्हणे मी तर छोटा

पंक्तीत वाढीन भात थोडा

माउ म्हणे मी केला नट्टा

माझी करूच नका थट्टा

अंतरपाट धरनार कोण?

बगळ्या शिवाय आणखी कोण

मंगलाष्टके म्हणणार कोण?

कोकिळेशीवाय आणख्री कोण

झाडावरून आली खारूताई

आहेराची ती करते घाई

बाहुलीसाठी आणला पाट

बाहुल्यासाठी आणला पाट

बगळा कसा उभारला ताठ

त्यांनी धरलाय अंतरपाट

लग्नामध्ये कोणाचा नाच

कुणाचा नाही मोराचा नाच

भटजी म्हणून वाघोबा आले

त्याना पाहून सारे पळाले

-  दिलीप खापरे