Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

भाउ पहा देतो ...

भाउ पहा देतो दम

मग आणतो बबलगम

ताई पहा ओढते कान

मग देते फुगा छान

बाबा पहा घेतात पाढा

मग देतात गोड पेढा

बाबांपेक्षा आईच बरी

कारण देते क्याडबरी

-  दिलीप खापरे