Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

अध्याय पांचवा

कृष्णास अर्जुन वदे वानिसि संन्यास एकदा योगा ॥

यातील निश्‍चयाने श्रेयस्कर कोणता सांग तो गा ॥१॥

मोक्षा दोनहि देती संन्यास तसाच योग कर्माचा ॥

श्रेष्ठ कर्मयोग असे बोले भगवान उत्तरी वाचा ॥२॥

द्वेष न कोणासह ही निरिच्छ जो तोच नित्य संन्यासी ॥

द्वद्व मुक्‍त कर्म करी बंधन तें नच कदापि हो त्यासी ॥३॥

कर्मयोग सांख्य असे भेद करी मूर्ख नच तसे ज्ञाते ॥

आचरिता एकाला दोहोचे जाण सर्व फल मिळते ॥४॥

सांख्याने स्थान मिळे कर्मयोग तेच मिळवुनी देतो ॥

कर्मयोग सांख्याला समजे ज्ञानीं खराच एकच तो ॥५॥

योगाश्रया न करितां कठिण महाबाहु कर्म संन्यास ॥

ब्रम्हपद सत्वर मिळे योगाने युक्‍त जो तया मुनिस ॥६॥

अपुले अंतर शोधी जिंकी जो इंद्रिया तसे मनही ॥

प्राण्याच्या आत्म्याला समजे जो पुरुष आपणा सम ही ॥७॥अ

ऐशा मतिनें कर्मे केली जरि सर्वदा तरी तीं ही ॥

कर्त्याला नच होती कर्मे ऐशींच बंधने कधिही ॥७॥ब

कर्मे मी न करी नित्यहि वसो ज्ञात्या मनी भावना ॥

बघता श्रवणीं स्पर्शा हुंगिता तसेंच खात असताना ॥८॥

चालता झोप घेता श्‍वासोच्छवासी मुखी सदा वदता ॥

मल विसर्जन करिता नेत्रांची उघड झाकही करितां ॥९॥अ

कर्मेही करितांना प्रवृत्त विषयांत इंद्रियें होती ॥

जाणावें हे ऐसे पुरुषाने सर्व कर्म या जगती ॥९॥ब

सोडुनीं फल आसक्‍ती ब्रम्हपदी कर्म अर्पीतो ॥

कमल पत्र जेवि जलें न भिजे कर्मे न बद्ध तैसा तो ॥१०॥

सोडूनि फलासक्‍ती व्हावयास आत्मशुद्धि केवळ तो ।

योगीच सर्व कर्मे देहेंद्रिय बुद्धि वाणिनें करितो ॥११॥

फलाशा त्याग योगी करुनी मिळवीच नित्य शांतीला ॥

वासना जन्य होतो फलाशा बंधन योग युक्‍ताला ॥१२॥

संन्यास मनें करुनी कर्मांचा इंद्रिया निग्रही जो ॥

नवद्वार देहस्थहि योगी काही करी न करवी जो ॥१३॥

परमेश्‍वर जीवाचे कर्तेपण कर्म तत्फल न निर्मी ॥

प्रकृतीच सदा असते मूलभूत पहा सर्वही कर्मी ॥१४॥

पापपुण्य काहीही ईश्‍वर ना घे कधीच कवणाचे ।

अज्ञान ज्ञानाला झाकी हें मूळ लोक मोहाचे ॥१५॥

ज्ञानाने नाशियले ज्यांचें अज्ञान सर्व ते लोक ॥

ब्रम्हपद तया दावी तेजस्वी ज्ञान ते जसा अर्क ॥१६॥

बुद्धि लीन जयांची ब्रह्मास तशी मनास विश्रांती ॥

निष्ठेस स्थैर्य तसे तत्परायण जे पुरुष या जगती ॥१७॥अ

पापें अशा जनांची ज्ञानानें सर्व पावती नाशा ॥

पुनर्जन्म ना येई निष्पापी त्या जनास ज्ञानि अशा ॥१७॥ब

हत्ती कुत्रे गाई पंडित विद्वान विनय युक्‍ता ना ॥

ज्ञानी मानी भावें चांडाळादिक समान सर्वा ना ॥१८॥

ज्यांचे मनास ऐशी समता येई असे जनन मरणा ॥

वसती जरि या लोकी दोहोना तेच जिंकिती जाणा ॥१९॥अ

ब्रह्म दोष रहित तसें सर्वाठायी समान हे असतें ॥

ब्रह्मा तयाच साठी ज्ञान्यांच्या बुद्धिला स्थैर्यही येते ॥१९॥ब

बुद्धि स्थिरता पावे गुंते ना जो कधीच मोहात ॥

पुरुष ब्रह्म वेत्ता तो न हर्षे प्रिय वस्तु हो जरी प्राप्‍त ॥२०॥अ

दुःखी तसा न होई वस्तू अप्रिय त्या जर मिळाली ॥

ऐसी समता येई वृत्ति तयाचि ब्रह्मपदी रमली ॥२०॥ब

विषयांत मन न गुंते मिळतो त्यालाच आत्म आनंद ॥

ज्ञानी ब्रह्माशी तो पावे तादात्म्य नित्य जे सुखद ॥२१॥

कौंतेय दुःख मूलक जन्मति जे इंद्रियामधें भोग ॥

आद्यंतवंत तयांत बुध न रमति परी करिति कीं त्याग ॥२२॥

काम क्रोधाला जो शरीर धारी तरी करी सहन ॥

योगी तोच खरा ही जाणा तो राहतो सुखात जन ॥२३॥

अंतः सौख्यानंदहि अंतर्ज्ञाने प्रकाशितच असतो ॥

ब्रह्मरुप तो होतो ब्रह्मातच लीन होय योगी तो ॥२४॥

द्वैत भाव पाप तसे नष्ट होय ते आत्म संयमी असती ॥

भूतहितेच्छू योगी ते निर्वाण ब्रह्म मिळवुनि घेती ॥२५॥

काम क्रोधा त्यजुनि आत्मसंयमनहि आत्मज्ञान तसें॥

मिळवी यतीस ऐशा ब्रह्म निर्वाण मिळे अनायासे ॥२६॥

दृष्टी भुवयामध्ये लावुनि शब्दादि बाहय विषयांना ॥

त्यागी नियमी प्राणा नासिकस्थ अपानादि वायूना ॥२७॥

इंद्रिय मन बुद्धीला संयमि तो क्रोध भय जया नाही ॥

मोक्ष परायण मुनि तो समजावा नित्य मुक्‍तसा राही ॥२८॥

तप यज्ञ यांस भोक्‍ता सर्वजन श्रेष्ठ भूत हितकारी ॥

ऐसे तो मज समजे शांती अक्षय्य असा पुरुष वरी ॥२९॥

सारांश

शा.वि.

धर्माने कथिलेंच कर्म करुनी सोडी अहंकार जो ॥

प्रेम द्वेष नसे मनास समता रात्रंदिनी शांत जो ॥

चिंता ना पुढली तशीच न करी गेहया मनी वस्तुची ॥

संन्यासीच खरा मती स्थिर जया त्या वाण ना शांतिची ॥१॥

समश्लोकी भगवद्‌गीता

संकलित
Chapters
प्रस्तावना
समश्लोकी भगवद्गीता अध्याय पहिला
समश्लोकी भगवद्गीता अध्याय दुसरा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय तिसरा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय चवथा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय पांचवा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय सहावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय सातवा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय आठवा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय नववा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय दहावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय अकरावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय बारावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय तेरावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय चौदावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय पंधरावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय सोळावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय सतरावा
समश्लोकी भगवद्गीता अध्याय अठरावा
कोण तू----?
अध्याय पहिला
अध्याय दुसरा
अध्याय तिसरा
अध्याय चवथा
अध्याय पांचवा
अध्याय सहावा
अध्याय सातवा
अध्याय आठवा
अध्याय नववा
अध्याय दहावा
अध्याय अकरावा
अध्याय बारावा
अध्याय तेरावा
अध्याय चौदावा
अध्याय पंधरावा
अध्याय सोळावा
अध्याय सतरावा
अध्याय अठरावा