Get it on Google Play
Download on the App Store

टोळ आणि मुंग्या

उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'

तात्पर्य

- ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.

इसापनीती कथा १५१ ते २००

इसाप
Chapters
लांडगा, कोल्हा व वानर लांडगा आणि घोडा लांडगा आणि बकरा कुत्रा आणि घंटा कोळी व मासा कोळी व रेशमाचा किडा कोल्हा व मुखवटा कोल्हा आणि लांडगा कोल्हा कावळा आणि सुरई हरिणी व तिचे पाडस हंस व बगळे घार व कबुतरे गरूड पक्षी व बाण चित्ता आणि कोल्हा स्वार आणि त्याचा घोडा खूप मित्र असलेला ससा कुत्रा व सुसर पारवा व कावळा वानर आणि कोल्हा घोडा आणि गाढव कोकीळ, पोपट व घार लांडगा आणि करडू मांजर व वटवाघूळ वानर आणि सुतार वाघ आणि चिचुंद्री सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा सापाचे शेपूट वेडावणारा पक्षी म्हातारा सिंह मेंढी व धनगर मत्सरी काजवा माणूस आणि दगड मांजर आणि चिमण्या माकड आणि मधमाशी कोल्हा आणि म्हातारी कोल्हा, लांडगा व घोडा करढोक आणि मासे हरिण आणि द्राक्षाचा वेल घुबडे, वटवाघुळे आणि सूर्य घार आणि शेतकरी दोन घोरपडी बोकड आणि काटेझाड बेडकी आणि तिचे पोर वानर आणि कोल्हा टोळ आणि मुंग्या सोन्याची अंडी देणारी हंसी सिंह, अस्वल, माकड व कोल्हा सिंहाची गुणज्ञता