चित्ता आणि कोल्हा
एकदा चित्त्याला असे वाटले की आपल्या कातडीवरील विचित्र व सुंदर ठिपके पाहिले असता, आपले सौन्दर्य सिंहापेक्षाही अधिक आहे, मग इतर प्राण्यांची काय कथा ? मग तो चित्ता सगळ्या प्राण्यांचा तिरस्कार करू लागला, तेव्हा एक कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे, ही तुझी मोठी चूक आहे, कारण अंगातील सद्गुणांच्या भूषणावाचून बाहेरच्या भपक्याला शहाणे लोक भूषण म्हणत नाहीत.'
तात्पर्य
- जो सुंदर आहे, त्याने जर सौन्दर्याचा गर्व केला नाही तर ते अधिक शोभा देईल.