शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा
एका खेडेगावातील लोकांचे चोरापासून रक्षण करण्यासाठी एक शिकारी कुत्रा होता. तो एके दिवशी आपल्या पिल्लाला घेऊन गंभीरपणे गावातून फिरत असता गावातील सगळी भिकार कुत्री त्याच्याभोवती गोळा होऊन भुंकू लागली. आपल्या वडिलांचा ह्या फालतू कुत्र्यांनी असा अपमान केलेला पाहून त्या शिकारी कुत्र्याच्या पोराला फार राग आला. मग ते आपल्या वडीलांना म्हणाले, 'बाबा, त्या कुत्र्यांवर तुटून पडून त्यांना चांगली शिक्षा का करत नाही?' त्यावर शिकारी कुत्रा म्हणाला, 'अरे मुला, ही भिकारी कुत्री गावात आहेत म्हणूनच माझी किंमत काय आहे हे लोकांना समजते आहे.'
तात्पर्य
- सर्वसामान्य लोकांनी काही कारण नसताना चालविलेल्या ओरडीकडे मोठे लोक लक्ष देत नाहीत.