कोकीळ, पोपट व घार
एका गरीब भोळ्या कोकीळाला एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती. ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'
तात्पर्य
- बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?