बेडकी आणि तिचे पोर
एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'
तात्पर्य
- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात.