Get it on Google Play
Download on the App Store

पद १२. श्लोक मोहत्कटाचे

नमस्कार केला मुनि येकदंता । तया नंतरे सद्गुरु साधुसंतां ।
जया नावडे लेशही ते अहंता । म्हणोनी मुनी वंदितो त्या महंता॥१॥

रतीचा पती जीववीला तयानें । तिची राखिली संकटी लाज यानें ।
स्वभक्तांसि जो देता राज्ययानें । कराव जनस्थानिंचे राज्य यानें ॥ २॥

जनस्था- निंचा देव तोषी जगासी। झुगारूनि दे मोदकाच्या ढिगासी।
स्वयें उद्धरी जो खगांसी मृगांसी । मना मुक्त होसी जरी त्यासी गासी ॥३॥

गणा- धीश जो हा भृगुक्षेत्रवासी । मनातीत तो सर्व विघ्ने विनासी ।
स्वभ- तासि जो देतसे जीवरासी । करी मुक्त संसारिंच्या जीवरासी ॥४॥

युगे लोटली आजि आला घरासी।पुन्हा आजि सांभाळिली लाज कैसी।
जया चिंतितो देव कैलासवासी । पहा दारणेच्या तटीं चिद्विलासी॥५॥

पहा गौतमी- च्या तटीं मोरयासी।कसे शोभतें आसन मोर यासी ।
सदा....चिंतिती थोर यासी । म्हणोनी भजा त्या सख्या सोयऱ्यासी ॥ ६॥

मजा रे भजा मूर्ति चिंतामणीची । त्यजारे त्यजा ज्यर्थ चिंता मनींची ।
क्षुधाबाप हा मुख्य गोवर्धनींची । दयापूर्ण होईल त्या स्वर्धनीची ॥ ७ ॥

फिरे नित्य बैसोनिया नीळकंठी । सुखें त्रिस्थळीमाजि त्या काळ कंठी ।
करी साखळ्या शोभते माळ कंठीं । कवी त्यापुढे नाचतो वाळवंटीं॥८॥

जन्ही जन्मले लोक या कलींत । तन्ही फार होती सुखी त्रिस्थळींत ।
भवाब्धीसि घेऊनियां अंजुळीत । पिती मान्य होतील मुक्तावळींत ॥९॥
 
गणेशासि वाहीन गंगाजळासी । समीन सिंदूर दूर्वादळासी ।
तयाला उणें काय त्या मंगळासी । म्हणे नाथ तो मान्य भूमंडळासी ॥१०॥

मध्वनाथ कवि सादर वर्णी । आयको कपिल सर्वहि कर्णी ।
ज्यासि आवडि बहू शमिपर्णी । तो कृपा करू सुधाकरवर्णी ॥११॥