पद १
ये गणराया मंगळमूर्ति ॥ ध्रु० ॥
पतितपावन दीनदयाळा ।
त्रिभुवनीं सोज्वळ तुझी कीर्ति ॥ १॥
कीर्तनरंगी नृत्य करी रे ।
संगीताची मिळवुनि पूर्ति ॥ २॥
मध्वमुनीश्वर म्हणतो मजला ।
दे वर्णाया निर्मळ स्फूर्ति ॥ ३ ॥
ये गणराया मंगळमूर्ति ॥ ध्रु० ॥
पतितपावन दीनदयाळा ।
त्रिभुवनीं सोज्वळ तुझी कीर्ति ॥ १॥
कीर्तनरंगी नृत्य करी रे ।
संगीताची मिळवुनि पूर्ति ॥ २॥
मध्वमुनीश्वर म्हणतो मजला ।
दे वर्णाया निर्मळ स्फूर्ति ॥ ३ ॥