पद ३
अरे हा देव गजानन रे ।
अंबानंदनु हा दे॥ ध्रु० ॥
आनंदमंदिर वंदि पुरंदर ।
चर्चुनी सिंदुर सुंदर उंदिरवाहन रे॥ १ ॥
तुंदिलमंडित तांडवपंडित ।
धुंडुनि दानव दंडित खंडित त्रासुनि रे ॥ २ ॥
मध्वमुनीश्वर कीर्तनि तत्पर ।
देखुनी सत्वर धांवत संकटनाशन रे ॥ ३ ॥