पद ११
गुण गावे तुझे गणराया ॥ धृ ॥
अबुजलोचन शंभुसुता तुज ।
देखु- नियां मन लोभे॥१॥
कुंदसुधाशरदिंदुसमद्युति ।
सुंदर तो रद शोमे ॥२॥
सिंदुरचर्चित उदिर वाहन ।
साजतसे तुज देवा॥३॥
रूप निरंतर पाहिन अंतरीं ।
वाटतसें मनिं हेवा ॥ ४ ॥
मध्वमुनीश्वर मागतसे तुज ।
पाव तूं विघ्न हराया ॥५॥